वैभववाडी/ –
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुर्ली येथील श्री कुर्लादेवीचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमा 29 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या उत्सवाला हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यांमधून व अन्य जिल्ह्यातून येत असतात . तरी उत्सव साजरा करताना देवस्थान उपसमिती मार्फत शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे ,श्री कुर्ला देवीचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक त्या कार्यालयाची देवस्थान उपसमिती मार्फत परवानगी घेण्यात यावी, देवीचा उत्सव हा साधेपणाने व गाव मर्यादित करण्यात यावा, मंदिरामध्ये महाप्रसाद व प्रसाद देवी समोर ठेऊ नये, मंदिर परिसरात दुकाने मांडू नयेत,मिरवणुकीत फटाके वाजवू नये,मंदिराच्या सभोवती लोटांगण घालू नये, साध्या पद्धतीने यात्रा करावी प्रत्येक व्यक्तीमध्ये 1 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवावे, प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करावा , मंदिरामध्ये व मंदिर परिसर सॅनिटायझरचा वापर करावा ,तसेच शासनाने व जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी घातलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे, याची सर्वस्वी जबाबदारी देवस्थान उपसमिती कुर्ली यांची राहील असे निवेदन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती कुर्ली चे अध्यक्ष यांना सरपंच कुर्ली यांनी दिले आहे .