स्मारकाची शिवसेना व ग्रामस्थांच्या श्रमदानातून साफ सफाई..
वैभववाडी/-
26/11 रोजी दहशतवादी हल्ला मुंबई शहरात झाला.या हल्ल्यात कर्तव्यदक्ष अधिकारी विजय साळसकर हे शाहिद झाले.या घटनेला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.26 नोव्हेंबर 2020 हा दिवस एडगाव येथील त्यांच्या स्मारकामध्ये वैभववाडी शिवसेनेच्या वतीने स्मृती म्हणून साजरा केला जाणार आहे .या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्ष वैभववाडी व एडगाव ग्रामस्थांच्या वतीने शाहिद विजय साळसकर यांच्या स्मारक परिसराची श्रमदानातून साफ सफाई करण्यात आली.
या वेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील,शहर प्रमुख प्रदीप रावराणे,उप शहर प्रमुख सुनील रावराणे,वैभववाडी तालुका व्यापारी मंडळाचे अध्यक्ष बंडू सावंत,हरकुळ बुद्रुकचे माजी सरपंच आनंद ठाकूर,गोविंद जांभवडेकर,उदयोगपती अशोक चव्हाण,प्रवीण गायकवाड, दीपक पवार आदी मान्यवर सहभागी झाले होते.