वैभववाडी /-

आठ दिवसांत आधार कार्ड सुविधा केंद्र सुरु करण्याचे तहसीलदार यांचे आश्वासन. वैभववाडीत जनतेच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे ठिय्या आंदोलन. वैभववाडी : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था याला संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार आहेत. खड्डे भरण्यासाठी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात यांच्यात मिलीभगत व हितसंबंध असल्यामुळे सदर डागडुजीची कामे रखडली आहेत. पुढील काही दिवसात रखडलेली रस्ता दुरुस्तीची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन या आंदोलनात अधिकाऱ्यांनी दिले आहे. परंतु अधिकाऱ्यांनी शब्द पाळला नाही तर त्यांना खुर्च्यांवर बसू देणार नाही. कोणतीही नोटीस न देता त्यांना कार्यालयात घेरावा घालू असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला आहे. वैभववाडी जनतेच्या विविध मागण्या व समस्यांसाठी गुरुवारी भाजपा वैभववाडी यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यापैकी वैभववाडीत आधार कार्ड सुविधा केंद्र सुरू करा. ही मागणी या आंदोलनात मान्य करण्यात आली आहे. तहसीलदार श्री. पवार यांनी पुढील आठ दिवसात तहसील कार्यालयात आधार कार्ड सुविधा केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. या आंदोलनाचा प्रारंभ भाजपा कार्यालयातून करण्यात आला. भाजपा पदाधिकार्‍यांनी संभाजी चौक ते तहसील कार्यालय अशी रॅली काढत ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे सरकारच करायचं काय.. खाली डोकं वर पाय. ठाकरे सरकार हाय हाय… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या ठिय्या आंदोलनात वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीर काझी, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, नगराध्यक्षा समिता कुडाळकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिलीप रावराणे, सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, बाळा हरयाण, सज्जनकाका रावराणे, भारती रावराणे, शुभांगी पवार, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, संजय सावंत, बाबा कोकाटे, किशोर दळवी, हर्षदा हरयाण, रितेश सुतार, प्रकाश पाटील, रज्जब रमदुल, संजय चव्हाण, रवींद्र रावराणे, संतोष पवार, सुनील भोगले व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या एसटी विभागातील अधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. आयटीआय इमारत बांधकामाचा विषय अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे रखडली असल्याचा आरोप प्रमोद रावराणे यांनी केला. 2011 पासून शेती वीज कनेक्शन न देणाऱ्या इलेक्ट्रिक कंपनीचा ठेका रद्द करा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित ठेकादारावर यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. दोन महिन्यात वीज कनेक्शनची कामे केली जातील असे आश्वासन ठेकेदाराने दिले आहे. यावेळी तहसीलदार रमेश पवार, नायब तहसीलदार अशोक नाईक, गटविकास अधिकारी विद्या गमरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, वीज वितरण उपकार्यकारी अभियंता श्री. सूर्यवंशी, आयटीआय, एसटी विभाग व जलसंधारण विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. फोटो – ठिय्या आंदोलनात सहभागी वैभववाडी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page