नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या दणक्यातनंतर कुडाळ बसस्थानकाची रखडलेली स्वच्छतागृहे झाली स्वच्छ..

नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या दणक्यातनंतर कुडाळ बसस्थानकाची रखडलेली स्वच्छतागृहे झाली स्वच्छ..

कुडाळ /-

काल नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत चे नगरसेवक व भाजप कार्यकर्ते यांनी
कुडाळ बसस्थानक येथे घेराव घालून,आगार प्रमुक व संबंधित अधिकारी यांना जाब विचारला होता.आज कुडाळ चे नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या दणक्यातनंतर कुडाळ बसस्थानकाची रखडलेली स्वच्छतागृहे अखेर प्रवाशी वर्गासाठी स्वच्छ करण्यात आली.यामुळे एसटी प्रवाशी महिला यांना आता स्वच्छतागृहाविना वंचित राहावे लागणार नाही.

कुडाळ बसस्थानकाची इमारत कोट्यवधी रुपये खर्च करून,तालुक्यातून बहुसंख्य प्रवासी त्या बस स्थानका जवळ येत असतात तेथे महिला वर्गासाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था महत्वाची होती आणि लोकांची मागणी होती.मात्र नगराध्यक्ष ओंकार तेली याच्या पुढाकाराने ती स्वच्छतागृहाची आजपासून वापरस आली आहेत.

अभिप्राय द्या..