कुडाळ /-

ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस.टी. लाल परीला करुणा विषाणू आपत्काल संचार बंदीचा प्रचंड आर्थिक फटका बसला असून राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन पूर्णतः कोलमडले आहे.कोरोना रुग्णांची संख्या जशी जशी कमी होत आहे तसं जनजीवन सुरळीत होत असताना प्रवासी पुन्हा एकदा एस टी प्रवासाकडे वळायला लागले आहेत.मात्र मनसेकडे आलेल्या तक्रारीनुसार परिवहन महामंडळाच्या आगारांचा नियोजनशून्य कारभार आणिढिसाळ व बेभरोशी वेळापत्रक यांचा फटका बसला आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.गाड्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे दैनंदिन नियोजित फेरी मार्ग रद्द करावे लागत आहेत.अशा परिस्थितीत जनतेमध्ये एसटीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह घेत असून भविष्यात त्याचा आणखीन मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने या सर्वांची गांभीर्याने दखल घेऊन बसस्थानक नियंत्रकांनी व आगार व्यवस्थापकांनी प्रवासी फेर्यांबाबत दैनंदिन वेळापत्रकाचे सुनियोजन करावे व वेळापत्रकाची प्रसिद्धी,आगार व बसस्थानक परिसरात फलकांद्वारे करावी जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही,ग्रामीण भागांना जोडणाऱ्या राज्य महामार्गावरून दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ फेऱ्यांचे नियोजन करावे,प्रवाशांना अधिक माहिती देण्यासाठी बस स्थानकात दोन नियंत्रक कर्मचारी नियुक्त करावेत अशा सूचना मनसेने कुडाळ आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

आगार प्रमुख श्री सुजित डोंगरे ती कर्मचारी तुटवड्यामुळे वेळापत्रक कोलमडत सल्याचे मान्य करून मनसेच्या सूचनांनुसार तात्कान अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मनसेच्या निवेदनात केल्या आहेत.आगार प्रमुख श्री सुजित डोंगरे यांनी कर्मचारी तुटवड्यामुळे वेळापत्रक कोलमडत असल्याचे मान्य करून मनसेच्या सूचनांनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page