आंबडपाल येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर..

आंबडपाल येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर..

कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव यांच्या हस्ते लोकार्पण…

कुडाळ /-

आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून आंबडपाल गावामध्ये विकास निधी मोठ्याप्रमाणात आलेला असून त्यातच ग्रामस्थांच्या मागणीनुसार विद्युत ट्रान्स्फार्मरची अत्यंत गरज होती त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळून आज कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती जयभारत पालव यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक ,जिल्हापरिषद पावशी मतदार संघाचे विभाग प्रमुख दीपक आंगणे ,सरपंच प्रणिता नाईक,ग्रा.पं सदस्य भरत आंबडपालकर ,जीजी सावंत,गोट्या चव्हाण ,पावशी सदस्य शेलटे ,प्रवीण सावंत ,वायरमन किशोर नाईक ,सुरेश तानिवडे,सुदाम सावंत,विलास सावंत,बाळा नाईक ,गुरुनाथ चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक आणि खासदार राऊत साहेब यांचे आभार मानले

अभिप्राय द्या..