शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख पदी श्री.कृष्णा धुरी यांची नियुक्ती

शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख पदी श्री.कृष्णा धुरी यांची नियुक्ती

कुडाळ /-

तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ मध्ये आज बैठक संपन्न झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या शिफारसीनुसार तालुक्यातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. आमदारांचे अगदी विश्वासू व्यक्तिमत्व तसेच कट्टर शिवसैनिक व युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे श्री.कृष्णा धुरी यांना उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कृष्णा धुरी यांच्यावर मोठी तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना कुडाळ तालुक्यातून सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

अभिप्राय द्या..