कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील कवठी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी राजन खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले.
आ.वैभव नाईक बुधवारी कुडाळ तालुका दौ-यावर आले होते. कवठी येथील दौऱ्यावेळी कवठी येथील भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी अनंत उर्फ राजन खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे आ.नाईक यांनी पक्षात स्वागत करीत शिवसेनेत सर्वांना मान सन्मान दिला जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, सरपंच रूपेश वाडयेकर, रूपेश पावसकर, शाखा प्रमुख गोपाळ कवठकर, उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, प्रशांत तेंडोलकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, महिला शाखा प्रमुख संचिता फडके, दिनेश गोरे, गौरेश वाडयेकर, मितेश वालावलकर, शंकर पाटकर, सुयोग ढवण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page