स्वतः मध्ये एकीचे बळ निर्माण करत तीनही अधिकाऱ्यांची कामगिरी स्वतंत्रपणे पार पाडताना
दोडामार्ग /-
दोडामार्ग तालुका दुर्गम तालुका म्हणून ओळखला जात असून यातच वारंवार आंदोलन , उपोषण सतत होत असतात तसेच कर्नाटक गोवा या दोन्ही राज्यांशी दोडामार्ग तालुक्याचे मैत्रिपूर्ण संबंध असल्याने गोव्यातून कर्नाटकात जाण्यासाठी व कर्नाटकातून गोव्यात येण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातून ये-जा करणे जवळ पडत असल्याने येथील महामार्गावर गाड्यांची रहदारी मोठ्या प्रमाणात होत असते त्यातच दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकी साठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने व दोडामार्ग तालुक्यामध्ये नगरपंचायत क्षेत्रात गटातटाचे राजकारण असल्याने पोलीस प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून त्यातच दोडामार्ग तालुक्यामधील पोलीस ठाणे मध्ये तीन वरिष्ठ अधिकारी होते परंतु गेला एक महिना अगोदर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असलेले कुलदीप पाटील यांच्यावर प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली त्यातच तीन चेक पोस्ट व पोलीस ठाणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांना स्वीकाराव्या लागल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर सोपवण्यात आल्याने प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी कुलदीप पाटील त्यांच्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून शासनाने घालून दिलेल्या सीमा बंदी या नवीन नियमांन नुसार दोडामार्ग तहसीलदार समोर व आयी येथे उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर पोलीस प्रशासनाचा अतिशय कडक असा बंदोबस्त तैनात ठेवत काम करत असलेल्या पोलीस प्रशासनाला दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता असून देखील प्रभारी पोलिस ठाणे अधिकारी कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत काम बजावताना दिसत आहेत.यातच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाल्याने दोडामार्ग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी तीनही अधिकार्यांची कामगिरी स्वतः संभाळत आपल्यात एकीचे बळ निर्माण करत सिंघम ची भूमिका घेत काम करताना दिसत आहेत. म्हणूनच दोडामार्ग तालुक्यातील सिंघम अशी देखील त्यांची ओळख निर्माण होताना दिसत आहे.