कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांनी जनतेच्या समस्या जाणून घेत तात्काळ लावल्या मार्गी..

कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांनी जनतेच्या समस्या जाणून घेत तात्काळ लावल्या मार्गी..

कुडाळ /-

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून या दोन्ही कार्यालयांशी निगडित रेशन कार्ड, धान्य पुरवठा त्याचबरोबर जनतेच्या इतर काही समस्या व प्रलंबित कामे जाणून घेत सर्व प्रश्नांबाबत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आवश्यक त्या सुचना देत समस्यांचे निरसन केले. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समस्या तात्काळ दूर करण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करीत आ.नाईक यांचे आभार मानले.

प्रांताधिकारी सौ.वंदना खरमाळे व तहसीलदार अमोल पाठक यांच्याशी चर्चा करीत जनतेच्या समस्या, विविध प्रश्न, प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावीत. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशाप्रकारच्या सूचना आ.नाईक यांनी प्रशासनाला केल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख राजन नाईक, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, जि.प.सदस्य राजू कविटकर, उपसभापती जयभारत पालव, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, माजी जि.प. सदस्य संजय भोगटे, रूपेश पावसकर, नगरसेवक सचिन काळप, न.पं.गटनेते बाळा वेंगुर्लेकर, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर,शैलेश घाटकर, राजू गवंडे, मितेश वालावलकर, आवळेगावचे सरपंच सुनिल सावंत, संदीप राऊळ, नितीन सावंत, सुयोग ढवण, प्रताप साईल, राजा कुबल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..