आचरा /-

ये अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है
ठाकरे सरकार मुरादाबाद,वीज बिल कमी झालेच पाहिजे अशा घोषणा देत आचरा,हिवाळा विभाग भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा विद्युत मंडळ कार्यालयावर धडक देत
विद्युत मंडळअभियंता मुगडे यांना निवेदन सादर केले. या वेळी लाॅकडाउन काळात थकित राहिलेल्या वीज ग्राहकांचे विद्युत मिटर तोडल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा भाजप पदाधिकारयांनी विद्युत मंडळ अभियंत्यांना दिला.

लाॅकडाउन काळात नागरीकांना भरमसाठ वीज बिलांचा शाॅक दिल्यानंतर वीज ग्राहकांचा वाढत्या असंतोषाचा उद्रेक होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती.मात्र आता उर्जामंत्र्यांकडून वीज बिलात सवलत देण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे सरकारने जनतेचा विश्वास घात केला.आम्हाला वीज माफी नको पण अवाजवी वाढलेली बीले कमी करा.फसवी आश्र्वासने देवू नका असे सांगत मालवण तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे आचरा विद्युत मंडळ कार्यालयावर धडक देण्यात आली. या वेळी विज बिलाची होळी केली गेली.मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मालवण उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस, महेंद्र चव्हाण,विभागिय अध्यक्ष संतोष कोदे, ,आचरा सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर, दिपक सुर्वे,प्रकाश मेस्त्री, डॉ प्रमोद कोळंबकर,समिर बांवकर,विजय कदम, प्रविण लब्दे, बांदिवडेकर यांसह अन्य भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी विद्युत मंडळ अभियंता मुगडे यांना भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेरावा घालत थकित वीज बिलाचे कारण दाखवत ग्राहकांचे वीज मिटर तोडण्याचा प्रयत्न झाल्यास वीज वाईट परिणाम होतील असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, उपसभापती राजू परुळेकर यांनी दिला. या वेळी आॅगष्ट सप्टेंबर वीज बिल भरूनही यशवंती बांदिवडेकर यांना नोव्हेंबर महिन्यात ४४४४४हजार बील आले कसे असा सवाल विचारत धोंडू चिंदरकर,राजू परुळेकर,जेराॅन फर्नांडिस संतोष कोदे यांनी विद्युत मंडळ अभियंता मुगडे यांना धारेवर धरले. या वेळी तोंडवळी येथे कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा, रेंगाळलेली चिंदर स्ट्रीट लाईट जोडणी, याबाबत मुगडे यांना जाब विचारण्यात आला.एका बाजूला असलेल्या विज मंडळ कार्यालयात येणाऱ्या वीज ग्राहकांच्या तक्रारीं,वीज बील समस्या जाणून घेण्यासाठी कोणी कर्मचारीच उपलब्ध नसल्याने येणाऱ्या ग्राहकांना आर्थिक भुर्दंडासहीत मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याची बाब मंगेश टेमकर यांनी मुगडे यांच्या निदर्शनास आणून तातडीने कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली.

या वेळी उपसभापती राजू परुळेकर यांनी आमदार वैभव नाईक यांनी घाई गडबडीत या सबस्टेशनचे उद्घाटन करुन वीज ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा आरोप परुळेकर यांनी केला आहे.यावेळी कार्यालयाबाहेर वीज बिलाची होळी करत सरकारचा निषेध व्यक्त केला गेला.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page