दोडामार्ग / –
तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांच्या कुटुंबियांचे आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवाजी घोगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेत सांत्वन केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रपुल्ल सुद्रीक, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, चिटणीस रुपेश जाधव, प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, जिल्हा कृषी सेलचे अध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी, कणकवली देवगड विधानसभा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, राविभूषण लाड आदींनीही यावेळी बोर्डेकर कुटुंबाचे सांत्वन केले.
दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व कुंब्रल गावचे रहिवाशी महादेव उर्फ बाबी बोर्डेकर (६०) यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अखंड सावंतवाडी तालुका असताना ते कोलझर मतदारसंघातून पंचायत समितीसाठी निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी उपसभापती पदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. सध्या ते गावच्या तंटामुक्त समिती आणि पाणी वाटप समितीचे अध्यक्ष होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लाकूड व्यवसायिक ते राजकीय नेता हा त्यांचा प्रवास संघर्षमय होता. दोडामार्गच्या जडणघडणीत विविध पदांवर काम करताना सुद्धा त्यांचे योगदान मोठ होत. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृतीने त्रस्त होते.
दरम्यान बाबी बोर्डेकर यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी पक्ष निश्चित उभा राहील असे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.