काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका उपाध्यक्षपदी सच्चिदानंद बुगडे यांची निवड,तर माजगाव जि.प.मतदारसंघ अध्यक्षपदी विल्यम सालढाणा यांची निवड…

काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका उपाध्यक्षपदी सच्चिदानंद बुगडे यांची निवड,तर माजगाव जि.प.मतदारसंघ अध्यक्षपदी विल्यम सालढाणा यांची निवड…

सावंतवाडी /-

काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका उपाध्यक्षपदी तळवडे येथील सामजिक कार्यकर्ते श्री.सच्चिदानंद मधुकर बुगडे यांची निवड करण्यात आली आहे ,तर माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अध्यक्ष म्हणून चराठ येथील माजी सरपंच श्री.विल्यम सालढाणा यांची निवड सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे.कॉंग्रेस ने ही निवड आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या दृष्टी कोनातून या निवडी केल्या आहेत.

यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र सांगेलकर , काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ऍड.दिलीप नार्वेकर , जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर ,श्रद्धा खामकर रायगड महिला जिल्हाध्यक्ष|,कौतुभ गावडे जिल्हाध्यक्ष विद्यार्थी कॉंग्रेस,ऍड राघू नार्वेकर शहर अध्यक्ष सावंतवाडी कॉंग्रेस,स्मिता वागळे,मंजुश्या डांगी,मोहसीन मुल्ला ,इंद्रजित अनगोळकर ,विल्यम सालढणाना ,जालींन लक्षमेशोर,सच्छिदानंद बुगडे ,अन्वर खान अन्य कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..