सावंतवाडी कारागृहातील मृत्यूप्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न केलेल्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.;मनसेची मागणी

सावंतवाडी कारागृहातील मृत्यूप्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न केलेल्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.;मनसेची मागणी

सावंतवाडी /-

सावंतवाडी राजेश गावकर मृत्यू प्रकरणी मनसेने पुन्हा एकदा आपला आवाज उठविला असून कारागृहात तत्कालीन कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या गावकर मृत्यूप्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न केलेल्या पोलीस अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ रोहिणी साळुंखे यांच्याजवळ मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी आज उपळावी उपविभागीय पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांच्याजवळ दिले येथील जिल्हा कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत असलेला राजश्री गावकर या कायद्याचा मृत्यू झाला होता यावर अधीक्षक पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आरोपी योगेश पाटील यांनी जिल्हा सत्र न्यायालय व व मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जामिनासाठी अर्ज केला असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता याप्रकरणी तपास करणारे येथील पोलिस अधिकारी योगेश पाटील व त्यांचे साथीदार यांना वाचवण्यासाठी दोषारोपपत्र न्यायालयात वेळेत सादर केले नाही.

तसेच आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे. जाणून बुजून त्यांनी या प्रकरणात दिरंगाई गेले आहे. त्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पदापासून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच संशयित आरोपी हे फरारी आहेत असे सांगून त्यांच्यावर तपासादरम्यान कारवाई करण्यात जाणून-बुजून वेळ घालविला. या सर्व घटनेची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी विनंती मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला कडून करण्यात आली. याची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी डॉ रोहिणी सोळंके या कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाचे निवेदन कार्यालयात उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांनी स्वीकारले तसेच याबाबत आपल्या वरिष्ठांना कल्पना देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर तालुका सचिव विठ्ठल गावडे, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, शहर सचिव आकाश परब, उप-विभागअध्यक्ष गौरेश गावडे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..