कुडाळ येथे आजी -माजी शूटिंगबॉल खेळाडूंचा एकत्रीत स्नेहमेळावा

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग बॉल खेळाडु, आयोजक व हितचिंतक यांचा एकत्रित स्नेहमेळावा भवानी मंगल कार्यालय पिंगुळी येथे वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अध्यक्षतेखाली तर राजा देसाई, अमरसेन सावंत, प्रमोद मोहिते, सुरेंद्र सकपाळ, देविदास कोलगावकर , भाऊ मिशाळ, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील आजी माजी खेळाडु, आयोजक व शूटिंगबॉल प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष श्री दिलीप उर्फ राजन गिरप यांनी शूटिंगबॉल खेळाचा विकास होण्यासाठी जास्तीची शिबिरे होणे गरजेचे आहे. त्यामुळे पाहिले शिबीर आपण वेंगुर्ला येथे घेत असल्याचे जाहीर केले.केव्हाही या खेळाला लागणारी मदत आपण माजी खेळाडु या नात्याने द्यायला तयार आहोत असे सांगितले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे श्री, दिनेश पवार ,किरण शिंदे, बाबल कुडाळकर, योगेश गावडे यांनी स्वागत केले.प्रास्ताविक श्री दिनेश पवार यांनी केले.सदर मेळाव्यामध्ये आयोजक श्री भाऊ मिशाळ व राष्ट्रीय पंच श्री.देविदास कोलगावकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुष्य देऊन सत्कार करणेत आला.
सत्काराला उत्तर देताना श्री. भाऊ मिशाळ म्हणाले, प्रत्येकाने या खेळाला योगदान दिले तरच पुढची पिढी तयार होईल, पण खेळ चालू असताना आपला संसार सुध्दा व्यवस्थित सांभाळणे आवश्यक आहे, तरच पुढे खेळ चालु राहू शकतो. सत्कारमुर्ती श्री देविदास कोलगावकर म्हणाले, शूटिंगबॉल खेळाचा विकास करावयाचा असेल तर जिल्हयात शूटिंग बॉलच्या तालुका व जिल्हा, स्पर्धा जास्तीत जास्त होणे आवश्यक आहेत, त्यासाठी सर्वानी एकदिलाने काम केले पाहिजे, खेळाडुच्या नोकरी साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच मुलांना ग्रेस गुण मिळवून देण्यासाठी सुध्दा प्रयत्न होणे गरजेचे आहे, या सर्वासाठी वरिष्ठ स्तरावर मी आपणांस मदत करेन.
यावेळी श्री राजा देसाई, श्री प्रमोद मोहिते,जिल्हा परिषद सदस्य श्री अमरसेन सावंत, पत्रकार आणि जिल्हा खेळाडू श्री दत्तप्रसाद पेडणेकर , श्री योगेश गावडे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एकनाथ केसरकर यांनी तर आभार श्री. सुरेंद्र सकपाळ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री राजन गिरप, राजा देसाई, सुरेंद्र सकपाळ, एकनाथ केसरकर, प्रमोद मोहिते, दिनेश पवार,किरण शिंदे, बाबल कुडाळकर ,अमरसेन सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page