मसुरे -/
मसूरे मर्डे पेमवडे येथील मोहम्मद आदम खान या युवकाने सापडलेला मोबाइल मूळ मालकाला परत करत आपल्या प्रामाणिक पणाचे अनोखे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. मसुरे बांदिवडे पूल नजीक महम्मद खान हा युवक जात असताना त्याला रस्त्यामध्ये पडलेला सुमारे वीस हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल मिळाला. मोहम्मद खान याने दूरध्वनीवरून संपर्क करून मूळ मालकाचा शोध घेतला असता सदर मोबाईल हा निवृत्त वनपाल मसूरे कावावाडी येथील विश्वास मसुरकर यांचा असल्याचे समजले. मोबाइल परत केल्या नंतर विश्वास मसुरकर यांनी मोहम्मद खान याला बक्षीस म्हणून देऊ केलेली रक्कम त्याने आभरपूर्वक नाकारली. मसुरे गावांमध्ये सर्वत्र मोहम्मद खान यांचे कौतुक होत आहे.