मालवण /-
दैवद्न भवन मालवण येथे यशोदा महिला सामाजिक संस्था मुंबई आणि रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवण, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्या मानाने मालवण येथे गरीबगरजू महिलांसाठी ‘दिवाळी भेट ‘म्हणून दिवाळीच्या फराळाचे साहित्य वाटण्यात आले. माथाडी कामगार नेते अण्णा साहेब पाटील यांच्या सुनबाई डॉ. सॊ. राजश्री हणमंतराव पाटील यांच्या माध्यमातून आणि बी. अशोक सर यांच्या महिलांविषयीच्या तळमळीतून गरजू महिलांसाठी हा कार्यक्रम यशोदा महिला संस्थेच्याअध्यक्ष सॊ. शामा पवार आचरेकर आणि रणरागिणी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष नीलम शिंदे यांनी सादर केला.
यावेळी मालवण शहरातील रणरागिणी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करून कार्यक्रम पार पडला.. प्रत्येक महिलेस साखर, मैदा, डालडा, रवा, चणाडाळ प्रत्येकी एक किलोच्या प्रमाणात वाटण्यात आले. महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून अतिशय आनंद झाल्याचे सॊ. शामा पवार
स्मृती कांदळकर सेजल परब, रश्मी परुळेकर, दीपा शिंदे, विद्या फर्नांडिस, नयना पोयेकर, मंदा जोशी, पल्लवी पारकर. तृप्ती मयेकर, सूची परब.आचरेकर आणि रणरागिणी अध्यक्ष नीलम शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.