मालवण /-

“टायगर ग्रुप सिंधुदुर्ग” आयोजित “एक फराळ आनंदासाठी” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन “मालवण तालुका टायगर ग्रुप” तर्फे आयोजन करण्यात आल होत..यावेळी दिवाळीच्या काळात जमा झालेला फराळ गरजू कुटिंबियांना आचरा -मशवी या ठिकाणी वाटण्यात आला ..यावेळी टायगर ग्रुप मालवणचे सक्रीय सदस्य सुरज भोसले ,नाॅवेल गिरकर,रोहन सावंत ,शंकर माने ,दिपेश माड्ये, प्रथमेश माने,प्रथमेश हरजकर अभिषेक फुलवाडीया,अमोल माने,समीर जाधव यांशिवाय महिला सदस्य शांती तोंडवळकर,दिपा पवार,सायली आचरेकर,साक्षी मयेकर,सुवर्णा चव्हान,दिपाली कोळंबकर ,सुनंदा जाधव,प्रमिला जाधव, धनश्री आचरेकर व स्वराज्य सामाजिकआणि संस्कुतिक संस्था चे सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रुपचे सक्रीय सदस्य विकास घाडीगावकर यांनी मांडली तर आभार प्रदर्शन टायगर ग्रुप कोकण कमिटी सदस्य वैभव वळंजू यांनी व्यक्त केलं.टायगर ग्रुप सिंधुदुर्गच्या या उपक्रमाचे सर्वस्तरांमधून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page