सावंतवाडी /-

जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष तथा येथील बाॅम्बे ट्रेडिंग कंपनी कापड दुकानाचे मालक जयंत कुलकणीॅ यांचे शनिवारी सकाळी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु उपचाराआधीच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, दोन मुलगे असा परिवार आहे. कुलकणीॅ यांच्या निधनाचे वुत्त समजताच व्यापारी वर्गाने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. राष्ट्रवादीचे जिल्हा व्यापारी सेलचे अध्यक्ष पुंडलिक दळवी, नगरसेवक आनंद नवगी यांनी कुलकणीॅ यांचे निधन धक्कादायक आहे. मार्गदर्शक हरपला, अशा शब्दात जयंत कुलकर्णी श्रध्दांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page