आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्या..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यात गेल्यावर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पुरामुळे शेती बागायती घरेदारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु अद्याप देखील याची नुकसान भरपाई न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या वर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेली नुकसान भरपाई शासनाकडून आपल्या कार्यालयात जमा झालेली असल्याची समजते परंतु अद्याप देखील याची पूर्तता केलीे नसल्याने नुकसान भरपाई त्वरित मिळण्या बाबत तसेच तांत्रिक त्रुटी व लाभार्थ्यांकडून अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता कृषी विभाग व महसूल विभागाच्या समन्वयाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात नुकसानीमुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा असे निवेदन दोडामार्ग तालुका युवासेना तालुका समन्वयक मदन राणे व शिवसेना तालुका संघटक तथा डोंगरी विभाग विकास समिती सदस्य सिंधुदुर्ग संजय गवस यांनी दोडामार्ग तहसीलदारांना दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page