चौके /-

आविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेच्या कोकण विभागीय संघटकपदी वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोगवे- शेळपी चे शिक्षक श्री. झिलु दादू गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड ही २० नोव्हेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आविष्कार फाऊंडेशन, इंडिया ( कोल्हापूर महाराष्ट्र राज्य ) ही संस्था सामाजिक, शैक्षणिक , कला , क्रीडा , वैद्यकीय , सांस्कृतिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत आहे . या संस्थेच्या विस्तारासाठी म्हापण गावचे सुपुत्र असलेले उपक्रमशील शिक्षक झिलु गोसावी यांची आविष्कार फाऊंडेशन चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी नेमणूकपत्र देउन कोकण विभागीय संघटक पदी निवड केली आहे.झिलु गोसावी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page