कुडाळ /-
भाजप मध्ये प्रवेश केलेले दिगंबर सावंत हे साळगाव शाखाप्रमुख नसून त्यांना एका गोष्टीचे आमीष दाखवून दिशाभूल करत पक्ष प्रवेश करून घेण्यात आला आहे.साळगाव शाखाप्रमुख हेमंत सावंत असून शिवसेनेचे काम जोमाने सुरू आहे. विरोधक स्वत: कबूल करत आहेत की साळगाव मध्ये शिवसेना वाढली आहे.जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळी मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत होत असून संजय पडते यांच्या प्रयत्नातून आमदार श्री वैभवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून साळगाव मध्ये झालेल्या विकास कामांवर जनतेने समाधानी होऊन विधानसभा निवडणुकीत आमदार श्री नाईक साहेब यांना साळगाव मध्ये १८० मतांचे लीड मिळाले तेव्हापासून विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकत चालली आहे.त्यामुळे वरिष्ठांना खुष करण्यासाठी अशा प्रकारचा त्यांचा खटाटोप चालु आहे.दिगंबर सावंत हे आमच्या सोबतच काम करतील याची आम्हाला खात्री आहे. असा खुलासा साळगावचे उपशाखाप्रमुख नामदेव तावडे यांनी केला आहे.