वडाचे झाड कोसळून घराचे नुकसान झालेल्या शीतल जामसंडेकर यांना शासनाकडून आर्थिक मदत.

वडाचे झाड कोसळून घराचे नुकसान झालेल्या शीतल जामसंडेकर यांना शासनाकडून आर्थिक मदत.

मालवण /-

वडाचे झाड घरावर कोसळून नुकसान झालेल्या सर्जेकोट येथील शीतल सीताराम जामसंडेकर यांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी ९५ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व शासनदरबारी पाठपुरावा केला होता. आज आम. नाईक, नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांच्या उपस्थितीत जामसंडेकर कुटुंबीयांना शासनाच्या माध्यमातून धनादेश देण्यात आला.
सर्जेकोट येथील बंदर जेटीनजीक शीतल जामसंडेकर यांच्या घरावर जून महिन्यात जुनाट वडाचे झाड कोसळले होते. यामुळे जामसंडेकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घराची पाहणी करून शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. याबाबत आम. नाईक यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाच्या माध्यमातून जामसंडेकर कुटुंबीयांना नुकसान भरपाईपोटी ९५ हजार १०० रुपयांची मदत देण्यात आली आहे. याबाबत जामसंडेकर कुटुंबीयांनी शासनाचे व आम. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, छोटू ठाकूर, भारती आडकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..