आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा.रमाकांत यादव यांचे निधन..

आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा.रमाकांत यादव यांचे निधन..

मालवण /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौध्द समाजातील पहिले प्राध्यापक रमाकांत यादव यांचे आज वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. प्रा.यादव यांनी विद्यार्थी दशेतच चळवळीत स्वतः ला झोकून घेतले होते. प्रा.रमाकांत यादव हे वैभववाडी तालुक्यातील कुसूर गावचे सुपूञ होत . 1938 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या समतेच्या सभेला 1988 मध्ये प्रा.रमाकांत यादव यांच्याच पुढाकाराने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. त्यांनी शेवट पर्यंत बौध्दजन पंचायत समिती मध्ये स्वतः ला वाहून घेतले होते. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. सिंधुदुर्गात त्यांच्या निधनाचे तिव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..