साने गुरुजी कथामाला मालवणचा ‘सविता पुरस्कार’ भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांना जाहिर..

साने गुरुजी कथामाला मालवणचा ‘सविता पुरस्कार’ भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांना जाहिर..

आचरा /-

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा सविता पुरस्कार मालवण शाखेच्या सदैव पडाद्यामागे राहून कार्य करणा-या अनुक्रमे भावना भालचंद्र मुणगेकर आणि कामिनी किरण ढेकणे ह्या महिलांना जाहिर झाला. कथामालेसाठी सदैव पडद्यामागे राहून कार्य करणा-या महिलांसाठी तुकाराम रामचंद्र पडवळ यांनी हा पुरस्कार यावर्षी आपले वडिल कै. रामचंद्र बापूजी पडवळ आणि आई कै. सविता रामचंद्र पडवळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कथामालेच्या वतीने महिला कार्यकर्त्यांसाठी पुरस्कृत केला होता. कथामालेने निवडसमितीद्वारे ऊभय महिला कार्यकर्त्यांची निवड केली असून रोख रक्कम, मानपत्र असे मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण *रविवार दिनांक 10 जानेवारी 2021 या दिवशी केंद्रशाळा आचरे नं.1 येथे दुपारी 3 ते 6 या वेळेत कथामालेच्या एका विशेष कार्यक्रमात होणार आहे. सदर पुरस्कार निवड समितीच्या वतीने निवड समिती प्रमुख पांडुरंग गुरुदास कोचरेकर आणि नवनाथ पांडुरंग भोळे यांनी ही निवड जाहिर केली आहे.

सदर पुरस्कार वितरणादिवशी कोकण मराठी साहित्य परिषदेचा एक साहित्यिक कार्यक्रम होणार आहे.पडवळ कुटुंबियांच्या वतीने तुकाराम रामचंद्र पडवळ यांनीही भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांचे अभिनंदन केले आहे

अभिप्राय द्या..