कोल्हापूर /-

समाजातील लोक दिवाळी ह्या सणानिमित्त नवीन कपडे,दागदागिने,गोडधोड पदार्थ,वस्तूंची खरेदी अशा अनेक उपक्रमानी दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सहात साजरा करतात. पण नेहमीच जीवन जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष त्यातच गरीबी यामुळे हाताला मिळेल ते काम करून स्वतःबरोबर कुटूंबियांचे पालन पोषण करत पुरूषांबरोबर उन्हात तर कधी पावसात काबाडकष्ट करणा-या पुरुष त्याचबरोबर महिलावर्ग ऊसतोड मजूर नावाने ओळखल्या जाणा-या उपेक्षित कुटूंबियांची दिवाळीही मोठया आनंदात साजरी व्हावी यासाठी सोशल सर्कल मल्टीपरपज मल्टीपरपज सोसायटीने भुदरगड तालूक्यातील व्हनुगती येथे झोपड्या मांडून राहणा-या या ऊसतोड मजूर कुटूंबियांना दिपावलीनिमित्त फराळ , साडया, फटाके , जिलेबी देवून त्यांच्या सोबत भोजन करून अध्यक्षा सौ सुमित्रा संदिप फराकटे ,सचिव सौ रोहीणी सुभाष भोसले , सहसचिव प्रशांत भोसले, संतोष चव्हाण, सौ प्राजक्ता चव्हाण, सुनिल देसाई, सचिन देसाई,श्री शिंदे यांनी आपला आनंद व्यक्त केला .
लहानमुले,महिलावर्ग यांच्या आनंदात सहभागी होवून त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आपल्या समाजकार्याला प्रेरणा ठरत असल्याचे अध्यक्षा सौ सुमित्रा फराकटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page