नवी दिल्ली /-

एलपीजी ग्राहकांसाठी ही एक कामाची बातमी आहे. कारण हा अनुदानासंबंधित मुद्दा आहे, त्यामुळे आपण लक्ष देणे आवश्यक आहे. खरं तर, घरगुती एलपीजी ग्राहक जेव्हा सिलिंडर बुक करतात आणि त्याच्या डिलिव्हरीच्या काही दिवसांनंतर त्यांच्या खात्यामध्ये जी काही अनुदानाची रक्कम येते, ते त्यास अंतिम मानतात. अशा परिस्थितीत असे ग्राहक ज्यांच्याकडे अनुदान नसलेले सिलिंडर आहे, ते अनुदानापासून वंचित राहतात. परंतु अद्याप बऱ्याच लोकांना हे ठाऊक नाही की गॅस सिलिंडरच्या वितरणासह सूट देखील दिली जाते. ही सवलत अनुदानाव्यतिरिक्त विना अनुदानित सिलिंडरवरही उपलब्ध आहे. कोणत्या परिस्थितीत त्याचा फायदा होतो त्याबाबत जाणून घेऊया.

वास्तविक, तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे ऑनलाईन पेमेंट केल्याने त्यांच्या वतीने डिस्काउंट ऑफर देखील देत असतात. केंद्र सरकारच्या डिजिटल पेमेंट मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी या एजन्सी ऑफर देतात. यामध्ये ग्राहकांना कॅशबॅक, इन्स्टंट डिस्काउंट, कूपन, कूपन रीडीम संबंधित इत्यादी काही सुविधा ग्राहकांना दिल्या जातात. बहुतेकदा असे होते की लोक सिलिंडर तर ऑनलाईन बुक करतात परंतु ते रोख रक्कम डिलिव्हरी द्यायला येणाऱ्या फेरीवाल्यांना देतात. अशा परिस्थितीत ते या ऑफरपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांना ऑनलाईन पेमेंटमधून जी सूट मिळणार होती, ती मिळत नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही ऑनलाईन सवलत अनुदानित आणि विना अनुदानित सिलिंडर अशा दोन्ही प्रकारांवर उपलब्ध आहे. ज्या कंपन्या या ऑफर देतात, त्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमचा समावेश आहे.
असे करावे ऑनलाईन पेमेंट
गॅस सिलिंडर मिळाल्यानंतर आपण मोबाइल अ‍ॅप पेटीएम, फोन पे, यूपीआय, भीम अ‍ॅप, गूगल पे, मोबिक्विक, फ्री-चार्ज इत्यादी लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर पैसे भरू शकता. यामुळे तुम्हाला सवलतीचा लाभ मिळेल. या प्लॅटफॉर्मद्वारे, जेव्हा आपण प्रथमच सिलिंडर बुकिंग आणि पेमेंट करता तेव्हा आपल्याला खूप चांगला कॅशबॅक देखील मिळू शकेल. पेटीएमने आपल्या ग्राहकांना 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला आहे.
हे पर्याय देखील वापरून पहा
ग्राहकांना हवे असल्यास ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग अ‍ॅप्लिकेशन व इलेक्ट्रॉनिक्स वॉलेटद्वारेही या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाईन गॅस बुकिंगचा एक फायदा म्हणजे आपण कोणत्याही ठिकाणाहून पैसे देऊ शकता. यामुळे आपण सिलिंडर वितरणाच्या वेळी रोख पैसे देण्याच्या त्रासातून देखील मुक्त होऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page