अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तिन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी..

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तिन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी..

मालवण /-

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काल रात्री उशिरा अटक केलेल्या तिन्ही संशयितांना आज ओरोस येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना सावंतवाडी कारागृहात हलविण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आपल्या मुलीला का नेले अशी विचारणा करून लाकडी दांडा, हाताच्या थापटाने मारहाण तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी समीर प्रभूसह अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार भूषण माडये याने काल रात्री उशिरा पोलिसांत दिली.
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचे व्हिडीओ शूटिंग केल्याची घटना पुढे आल्यावर पोलिसांनी काल मुलीचा प्रियकर भूषण शरद माडये (वय-२२) रा. तारकर्ली, प्रथमेश सुधाकर ढोलये (वय-२४) रा. धुरीवाडा व केशव ध्रुवबाळ फोंडबा (वय-२४) रा. सर्जेकोट या तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात बलात्कार, विनयभंग, पोक्सो माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आज या तिन्ही संशयितांना ओरोस येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक संध्या गावडे करत आहेत. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त करण्याची कारवाई केली आहे.

अभिप्राय द्या..