दयानंद कुबल ठरले मुंबईचे “द रियल हिरो”!!

दयानंद कुबल ठरले मुंबईचे “द रियल हिरो”!!

सिंधुदुर्गच्या भूमीपुत्राच्या कोरोना काळातील सामाजिक कार्याची एचडीएफसी बँकेने घेतली दखल..

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमीपुत्र असलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले श्री. दयानंद श्रीराम कुबल यांना एच.डी. एफ.सी. बँकेकडून गौरविण्यात आले आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, सिंधुदुर्ग तसेच इतर अनेक जिल्ह्यात गरीब, बेरोजगार आणि बेघर लोकांना कोकण संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप, तसेच रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या लोकांना ठाणे येथे अन्नदानाचे केलेले कार्य बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या एच.डी. एफ.सी. बँकेने विचारात घेऊन त्यांचा सन्मान केला आहे. आपल्या आसपास काम करणारा “मुंबईतील एक रिअल हिरो” अशा आशयाखाली आपल्या वेबसाईटवर उल्लेखित करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा केला आहे.

श्री दयानंद कुबल हे कोकण संस्थेच्या माध्यमातून गेली दहा-पंधरा वर्षे सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतात. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामात कोकण विकास आघाडीच्या माध्यमातुन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपर्क प्रमुख म्हणून काम करतांना कामाचा ठसा उमटवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शैक्षणिक उपक्रम, रक्तदान शिबीरे यांचे ते वेळोवेळी आयोजन करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना दिलेल्या सन्मानाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे

अभिप्राय द्या..