आचरा /-
आचरा मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारूच्या नशेत असलेल्या कारचलकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीवरील पितापुत्र दोघे गंभीररित्या जखमी झालेत. या अपघाताची भीषणता एवढी होती की दुचाकी व त्यावरील पितापुत्र दोघेही दूरवर फेकले गेले या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा पुरता चक्काचूर झाला व दुचकीचेही नुकसान झाले. अपघातातील जखमींना मालवण येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. हा अपघात सोमवारी रात्री झाला. कारचलकावर आचरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आचरा पिरावडीतील रहिवाशी रवींद्र रामचंद्र जोशी वय 57 व त्यांचा मुलगा ओंकार रवींद्र जोशी 27 हे सोमवारी रात्री आपल्या ताब्यातील दुचाकीने मालवण वरून अचऱ्याच्या दिशेने येत होते. अचऱ्यात पोचण्यासाठी काही मिनीटाचे अंतर असताना आचरा टेंबली नजीक आले असता मागून भरधाव वेगाने व्यागणार कार घेऊन येणारे चेतन गजानन राऊळ वय 28 (रा पिंगुळी मठ) यांनी जोशी यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली ही धकड एवढ्या जोरदार होती की दुचकीसह पिता पुत्र जोशी हे दुचाकीस ह दूर फेकले गेलेत यात रविंद्र जोशी यांच्या पायाला तर ओंकार जोशी याच्या डोक्याला व पाठीला मार लागला.
दैव बलवत्तर म्हणून जोशी पितापुत्र वाचलेत
पिंगुळी येथील राऊळ हे भरधाव वेगाने व्यागणार कार घेऊन आचरा दिशेला येत होते त्यांची सुरुवातीला रस्त्यावर असलेल्या बैलाला त्यांच्या कारची धडक बसली त्यानंतर पुढे जात असलेल्या जोशी यांच्या दुचकीस धडक बसली बैलास धडक बसल्याने कारचा थोडा वेग कमी झाला असल्याने दुचाकीला बसलेल्या धडकेची तीव्रता कमी होती अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. कार चालवणारे राऊळ हे दारूच्या नशेत होते असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कारचालक राऊळ यांच्यावर कलम279, 337, 338, 184, 185 नुसार गुन्हा दाखल केला आहे . या घटनेचा तपास आचरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल देसाई व चव्हाण करत आहेत.