मळगाव येथे अपघात..

मळगाव येथे अपघात..

सावंतवाडी /-

मळगाव पेट्रोल पंपानजीकच्या वळणावर चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक किरकोळ जखमी झाले. चंद्रकांत गावडे (६५, रा.अणसुर) असे चालकाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास झाला. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
चंद्रकांत गावडे हे दुचाकीवरून अणसुरला जात होते. दरम्यान ते मळगाव पेट्रोल पंपानजीक आले असता सावंतवाडीच्या दिशेने जात असणाऱ्या चारचाकीत समोरासमोर अपघात झाला. तात्काळ १०८ रुग्णवाहिका उपलब्ध प्राचारण करण्यात आली. रुग्णवाहिका चालक रमेश टेमकर तसेच मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील ठाकुर यांनी त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांना किरकोळ दुखापत झाली असून उपचार चालू आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा सुरू आहे.

अभिप्राय द्या..