चौके /-
सातारा येथून मालवणला येणाऱ्या पर्यटकांच्या कारला आज दुपारी चौके वावळ्याचेभरड येथील वळणावर कारचा टायर फुटल्याने कार रस्त्या शेजारी असलेल्या झाडाला धडक बसून अपघात झाला आहे. ही धडक जोरदार बसल्याने कार मधील प्रवाशांच्या डोक्याला दुखापद झाली असून, एक प्रवासी गंभीर जख्मी झाला असून इतर प्रवाशी किरकोळ जख्मी झाले आहेत.
या प्रवाश्यांना १०८ रुग्णवाहिकेने मालवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कार मधून एका लहान बालकासह पाचजण प्रवास करत होते. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी अपघातस्थळी उदय गावडे, बाबू पाटकर, अमित चव्हाण, महेश पेंडूरकर, मधुकर चौकेकर, गोविंद गावडे आदींनी धाव घेत अपघातग्रस्त प्रवाश्यांना सहकार्य केले आहे.