ग्रंथालय महितीशास्त्र पदव्युत्तर परीक्षेत प्रांजली ढोणूक्षे प्रथम अपर्णा मांजरेकर द्वितीय तर पंकज जाधव तृतीय

ग्रंथालय महितीशास्त्र पदव्युत्तर परीक्षेत प्रांजली ढोणूक्षे प्रथम अपर्णा मांजरेकर द्वितीय तर पंकज जाधव तृतीय

सावंतवाडी /-

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रंथालय माहितीशास्त्र पदव्युत्तर (एम. लीब) परीक्षेत येथील श्रीराम वाचन मंदिराचा निकाल ९५ % लागला आहे. या परीक्षेत कागल येथील प्रांजली तानाजी ढोणूक्षे हिने ९४ % गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मालवण येथील अपर्णा कुणाल मांजरेकर (९२.६८%) व देवगड जामसंडे येथील पंकज भिवा जाधव (९०.३८ %) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सावंतवाडी वाचन मंदिराचे अध्यक्ष ॲड. दीपक नेवगी, कार्याध्यक्ष प्रवीण बांदेकर, केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, केंद्र संयोजक प्राध्यापक डॉ.जी ए बुवा, ग्रंथपाल महेंद्र पटेल आदींनी अभिनंदन केले आहे

अभिप्राय द्या..