वेंगुर्ला / –

शिवराज अभ्यासिका दाहिसर केंद्र आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ले न्यू इग्लिश स्कूल उभादांडाची कु.लिलावती केळूसकर हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार,तत्वे विद्यार्थ्यांना माहित व्हावी व त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणुन हि स्पर्धा आयोजित करुन या स्पर्धेत महात्मा गांधी हा विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आला होता.
या राज्यस्तरीय आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेत राज्यात पहिला नंबर मिळवणा-या लिलावती केळूसकर हिला प्रा.वैभव खानोलकर यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशालेचे मुख्याध्यापक वाळवेकर आणि संस्था अध्यक्ष विंरेद्र आडारकर तसेच संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page