वेंगुर्ला /-

आता होणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती वर महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आतापासूनच कामाला लागावे,असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा साई मंगल कार्यालय येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शंकर कांबळी, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर,सुनिल डुबळे,सचिन देसाई,तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,सभापती अनुश्री कांबळी,उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, म्हाडाचे कोकण विभागीय सदस्य सचिन वालावलकर, शहरप्रमुख अजित राऊळ,
नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम
महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले,महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर,तालुका युवासेना प्रमुख पंकज शिरसाट,उपतालुकाप्रमुख संजय गावडे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना संजय पडते पुढे म्हणाले की, खासदार, पालकमंत्री, आमदार यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी या जिल्यात येत आहे.मात्र विकासकामाचे श्रेय भाजप घेत आहे.तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आपली सत्ता नसल्याने विकासकामांना ब्रेक लागत आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेवर आपली सत्ता येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागणे गरजेचे आहे.यावेळी बोलताना माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले की रेडी येथील उषा ईस्पत कंपनी सुरू होणे व रोजीरोटीच्या दृष्टीने आवश्यक असलेला खनिज व्यवसाय सुरू होणे आवश्यक आहे.यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.वेंगुर्ला तालुक्यातील पाच जि.प.व दहा पं. स. च्या जागा तसेच वेंगुर्ले न.प.वर भगवा झेंडा फडकला पाहिजे यादृष्टीने शिवसेना वाढीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे,असेही ते म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पालकमंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.युवासेनेचे
नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.तसेच यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी इतर पदाधिकारी यांनीही मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page