कणकवली /-
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व आम्ही कणकवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांच्या १५ व्या स्मृतिदिन कणकवली रेल्वे टेशन येथे दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला.यावेळी प्राध्यापक मधु दंडवते यांचा स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करुन साधेपणात साजरा करण्यात आला.मान्यवरांनी मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी कृष्णकुमार शेठ,जेष्ठ पत्रकार
अशोक करंबेळकर,सामाजिक कार्यकर्ते संजय मालांडकर,भाऊ चिरेकर, प्रसाद वालावलकर,प्रशांत तांबे,संजय खरीवले व कोकण रेल्वे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.