कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात मंगळवारी मिळालेल्या दिवसभरातील अहवालानुसार एकूण ३ कोरोना रुग्ण मिळाले, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ओरोस येथे २ तर गुढीपूर येथे १ असे एकूण ३ कोरोना सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात एकूण
४७२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४६६ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या ६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण ११५८ तर बरे झालेले रुग्ण ११०१ आणि सक्रिय रुग्ण २० आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page