बांधकाम कामगारांना इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारे सुरक्षा किट वाटप मनसेने पाडले बंद..

बांधकाम कामगारांना इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारे सुरक्षा किट वाटप मनसेने पाडले बंद..

ओरोस /-

ओरोस गोविंद मार्केट व कणकवली येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप करण्याच्या शिबिरांबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी मनसेकडे प्राप्त होत्या.कामगारांना किट साठी वारंवार हेलपाटे पडणे,किट मधील काही वस्तू गायब असणे,यादीनुसार वा हजेरीनुसार वितरण न करता खाजगी एजंटच्या माध्यमातून आलेल्या कामगारांना प्राधान्य देवुन गोर गरीब कामगारांवर अन्याय करणे,एजंटांमार्गात पैसेे उकळने अशा अनेक तक्रारी मनसेकडे प्राप्त होत्या.आज दि.10 नोव्हेंबर 2020 रोजी ओरोस येथील वितरण प्रक्रियेत असाच सावळा गोंधळ चालू असून काही एजंट दडपशाही करत असल्याच्या तक्रारी कामगारांनी दूरध्वनीद्वारे मनसेकडे केल्या.त्याची तात्काळ गंभीर दखल घेत मनसेचे शिष्टमंडळाने शिबिराच्या ठिकाणी धडक देत वाटप प्रक्रिया थांबविली.कामगारांकडून प्राप्त तक्रारिंच्या अनुषंगाने कामगार अधिकारी,वितरण संस्था व्यवस्थापक व मनसेचे शिष्टमंडळ अशी संयुक्त बैठक घेऊन वाटपा संदर्भात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कामगारांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत असे सुयोग्य नियोजनच करूनच वाटप प्रक्रिया राबवावी अशी सूचना मनसे पदाधिकऱ्यांनी केली.शिवाय तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करून वाटप प्रक्रिया राबवावी अशी मागणी मनसेने लावून धरली.शेवटी कामगार कार्यालयातील सुविधकार अधिकारी श्री.कुबल यांनी दूरध्वनीवरून येत्या दोन दिवसांत बैठक आयोजित करून नियोजन केले जाईल अशी हमी दिल्याने प्रकरण थांबले.यावेळी मनसेने तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विनोद सांडव, जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,बाबल गावडे,दीपक गावडे, सचिन ठाकूर,सुंदर गावडे,गुरू मर्गज,रामा सावंत,हितेंद्र काळशेकर यासंह पदाधिकाऱ्यांनी कामगारांना मनःस्ताप व आर्थिक भुर्दंड पडल्यास मनसेशी गाठ आहे असा इशारा दिला.

अभिप्राय द्या..