एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि सदोष नूतन इमारतीविरोधात कुडाळ भाजपाचे जोरदार आंदोलन..

कुडाळ /-

एस टी कर्मचाऱ्यांना न्याय आणि प्रवाशांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी आज कुडाळ भाजपाच्या वतीने कुडाळ एसटी डेपोमध्ये आंदोलन छेडण्यात आले

कुडाळ तालुक्यातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी ग्रामीण भागातील लोकांना अतिशय उत्तम सेवा देत असून कोविड काळात जीवावर उदार होऊनसुद्धा ह्या लोकांनी सेवा दिली. पण या कर्मचाऱ्याना वेळेवर कामाचा मोबदला न दिल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आज त्यांच्यावर आली आहे. या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर तरी त्यांचा पगार मिळावा, तसे न झाल्यास किंवा आघाडी सरकारने आणखी विलंब केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज कुडाळ मंडल अध्यक्ष श्री विनायक राणे यांनी शासनाला दिला. त्याचप्रमाणे, कुडाळच्या नूतन इमारतीच्या निकृष्ट कामाबद्दल निवेदनाने आगार व्यवस्थापकांचे लक्ष वेधण्यात आले.

कुडाळच्या नूतन बसस्थानक बांधणीच्या निकृष्ट दर्जाबद्दल लक्ष वेधताना श्री विनायक राणे यांनी म्हंटले आहे की या इमारतीचे काम धोकादायक असून उदघाटनापूर्वीच प्लास्टरला तडे गेले आहेत. कोट्यावधी रुपये खर्चून ही इमारत नेमकी कोणासाठी बांधली आहे हा संशोधनाचा विषय झाला आहे. प्रवाशांची सोय व सुरक्षितता, निवारा, स्वच्छतागृह या सर्वच बाबतीत हे बसस्थानक आजच गैरसोयीचे ठरत आहे. उद्या याचा त्रास सामान्य जनतेला होणार आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी श्री विनायक राणे यांनी केली आहे.

आजच्या या आंदोलनप्रसंगी कुडाळ मंडल अध्यक्ष श्री राणे यांच्यासह ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, महिला ओबीसी जिल्हाध्यक्षा सौ दीपलक्ष्मी पडते, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, जिल्हा पदाधिकारी राजू राऊळ, नगराध्यक्ष ओंकार तेली,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,शहर अध्यक्ष श्री राकेश कांदे, राकेश नेमळेकर, युवा नेते आनंद शिरवलकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे, महिला तालुकाध्यक्ष सौ. आरती पाटील, नगरसेवक सुनील बांदेकर, देवेन सामंत, दादा साईल, राजा धुरी, चेतन धुरी, सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री राजवीर पाटील, प्रसन्ना गंगावणे, योगेश बेळणेकर, सुश्मित बांबूळकर, विश्वास पांगुळ, अनंतराज पाटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page