वैभववाडी /-
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या २०२० च्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थित आरक्षण सोडत काढण्यात आली.सुर्वणा मंगल कार्यालय वैभववाडी येथे सृष्टी शेळके या लहान मुलींने सोडतीच्या चिठ्या काढल्या.
यावेळी तहसिलदार रामदास झळके, मुख्याधिकारी सुरज कांबळे, पोलिस निरीक्षक अतुल जाधव व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचीही दुसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे.सन २०१५ साली नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली होती. नगरपंचायतीचे एकूण १७ प्रभाग असून१७ नगरसेवकांच्या जागा आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार या आधी ज्या प्रभागात ते आरक्षण पडले होते.ते प्रभाग वगळून त्या खालोखाल लोकसंख्या असलेल्या प्रभागात ही सोडत काढण्यात आली.
यामध्ये प्रथम अनु जातीच्या २ जागे साठी आरक्षण सोडत काढण्यात आली.त्यानुसार प्रभाग क्रमांक ९ हा अनु जाती महिला तर प्रभाग क्र.६ अनु,जाती साठी आरक्षित झाला आहे.
तर अनु.जमातीसाठी १ जागा असून प्रभाग क्रमांक ११ हा महिलांसाठी राखीव आहे.
तर नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण ५.जागा आरक्षित आहेत.यामध्ये प्रभाग क्रमांक ३, ५, व १५ हे तीन प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत.तर प्रभाग क्रमांक १४ , व १ हा ना.म.प्र.खुला आहेत.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण ९ जागा असून यातील ४ जागा सर्वसाधारण महिला व ५ सर्वसाधारण जागा आहेत.प्रभाग क्र.२, ४, १६, १७ सर्वसाधारण महिलांसाठी तर प्रभाग क्रमांक ८, १३, १२, १०, ७ हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.
प्रारुप प्रसिद्धी दिनांक १८ नोव्हेबर रोजी होणार आहे.तर यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी दि.१८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दुपारी ३.वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
आरक्षण सोडतीच्यावेळी नगराध्यक्षा समिता कुडाळकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे,.संजय सावंत, संतोष माईणकर यांच्यासह नगरसेवक व नागरीक उपस्थित होते.