मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री. गणेशाची विधीवत प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.