वेंगुर्ल्यात ‘कायापालट‘ लघुपटाचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शुभारंभ..

वेंगुर्ल्यात ‘कायापालट‘ लघुपटाचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शुभारंभ..

वेंगुर्ला /-

श्री सातेरी व्यायामशाळा, श्री सातेरी कला अकादमी आणि विद्या एंटरटेनमेंट यांच्या सौजन्याने ‘व्यसन मुक्ती‘ या सामाजिक विषयावर व्यसन मुक्त अभियानांतर्गत ‘कायापालट‘ या लघुपटाचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आज सातेरी व्यायामशाळा येथे पार पडला.

यावेळी श्री सातेरी कला अकादमीचे सदस्य, तसेच विद्या एंटरटेनमेंटचे संचालक विध्देश आईर, लघुपटातील सिने कलाकार मनोहर कावले, प्रााकर आजगावकर, आबा मडकईकर, मार्गदर्शक किशोर सोन्सुरकर, महेश वाडकर, दुर्गेश आडारकर, राहुल आडारकर, सेजल अरवारी, हेमांगी सारंग, धनश्री वेंगुर्लेकर, प्रशिक्षक अंकित सोन्सुरकर, संचालिका अबोली सोन्सुरकर, व्यायाम शाळेचे व्यवस्थापक हेमंत नाईक आणि सर्व व्यायामपटू आणि लघुपटातील कलाकार प्रणिता परब, राजलक्ष्मी लाड उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष यांनी वेंगुर्ल्यातील उदयोन्मुख तरूण कलाकारांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सातेरी व्यायामशाळा राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल अभिनंदन केले. नगराध्यक्षांच्या हस्ते कला अकादमीच्यावतीने कलाकारांचा सन्मान करण्यात आला. भविष्यात विविध सामाजिक उपक्रमावर व सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळावर लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा उद्देश आणि सिंधुदुर्गाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करण्याचा मानस विद्या एंटरटेनमेंटचे प्रमुख विध्देश आईर यांनी व्यक्त केला.

अभिप्राय द्या..