युवक काँग्रेसतर्फे पल्लवी तारी यांचा सत्कार..

युवक काँग्रेसतर्फे पल्लवी तारी यांचा सत्कार..

मालवण /-

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी येथील केंद्रमार्फत घेण्यात आलेल्या वृत्तपत्र पदविका परीक्षेत ९३.५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्षा पल्लवी तारी यांचा कुडाळ – मालवण युवक विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या हस्ते कुडाळ येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा वेंगुर्ले पं.स. उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब, प्रवक्ता अरविंद मोंडकर, कुडाळ विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, कुडाळ युवक शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, मालवण शहराध्यक्ष गणेश पाडगावकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राजकारण करता करता समाजातील विविध प्रश्नांवर पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलण्याच्या दृष्टीने पत्रकारिता एक उत्तम साधन असल्याने त्याकडे मी लक्ष केंद्रित करून आज यश मिळवल आहे, असे यावेळी पल्लवी तारी यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..