मालवण पोलिस निरीक्षकपदी एस. एस.ओटवणेकर..

मालवण पोलिस निरीक्षकपदी एस. एस.ओटवणेकर..

मालवण /-

मालवण पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून सोनू ओटवणेकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी त्यांनी पदभार स्विकारला. मालवणचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी रत्नागिरी येथे बदली झाल्याने पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

मात्र आता पोलीस निरीक्षक म्हणून सोनू ओटवणेकर यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर हे रायगड जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी मुंबई, अहमदनगर, मिरज, सांगली, आचरा या पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. काही काळ ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. ओटवणेकर हे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचे रहिवासी आहेत. सध्या ते कुडाळ तालुक्यात वास्तव्यास आहेत.

अभिप्राय द्या..