सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने संपन्न..

सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने संपन्न..

सावंतवाडी /-

येथील नगरपालिकेची मासिक बैठक आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी शासनाकडून आलेल्या नोटिफिकेशन संदर्भात चर्चा करण्यात आली.

या ऑनलाइन बैठकीला नगराध्यक्ष संजू परब यांच्यासहित मुख्याधिकारी संतोष जिरगे उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर व सर्व नगरसेवकांनी सहभाग घेतला होता यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी शासनाकडून माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना त्यांच्या घराचे घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगितले तसेच शहर विकासाला करण्यासंदर्भात आवश्यक असलेल्या दाखल यासंदर्भातही शासनाने योग्य ती जाहीर केल्याचे सांगितले यावेळी नगरसेवकांकडून माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना माफ केलेल्या घरपट्टी ची नुकसान भरपाई शासनाकडून घेण्यात यावी अशी सूचना करण्यात आली. तसेच शहरातील विविध विकास कामावर व काही समस्यांवरही नगरसेवकांनी नगराध्यक्ष श्री परब यांचे लक्ष वेधले.

अभिप्राय द्या..