ओझर हायस्कुल विद्यार्थ्यांना मास्क भेट.

ओझर हायस्कुल विद्यार्थ्यांना मास्क भेट.

ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे सौ श्यामल शामसुंदर सावंत पुर्वाश्रमिच्या वायरी – मालवण येथील पुष्पा मधुकर परब यांच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुलांसाठी मास्क भेट दिले. शाळेचे मुख्याध्यापक श्री पी. आर. खोत यानी त्याचा स्वीकार केला.या कार्यक्रम प्रसंगी प्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस संस्थेचे पदाधिकारी श्री उदय परब यांनी पुष्पहार अर्पण केला. शिक्षक श्री पी. के. राणे यानी विचार मांडले. प्रास्ताविक श्री प्रविण पारकर यानी केले. या प्रसंगी कांदळगाव परबवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पल्लवी राणे, ओझर शाळेचे लिपिक श्री रविराज जाधव, कर्मचारी श्री भास्कर पाताडे, मधुसूदन परुळेकर, श्री शेखर राणे आदी उपस्थीत होते. सौ.सावंत यानी कांदळगाव शाळा नंबर 1, परबवाडा शाळा नंबर 2, आणि दोन्ही अंगणवाडी मधिल मुलांसाठीही मास्कचे वाटप केले.

अभिप्राय द्या..