कोव्हीड १९ च्या महामारीमुळे अनेक वृद्धाश्रम व परप्रांतीय यांची उपासमार झाली होती.अशा गरजूंना धान्य देण्यासाठी “एक हात मदतीचा” या संकल्पनेअंतर्गत वजराट गावाच्या वतीने गावातील रेशनिंग कार्ड धारकांना १ किलो धान्य जमा करण्याचे आवाहन श्री गिरेश्वर सोसायटीतर्फे करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ३५० कार्डधारकांनी आपल्याला प्रधानमंत्री मोफत अन्नधान्य योजनेअंतर्गत मिळालेल्या धान्यातील १ किलो प्रमाणे धान्य गोळा केले. गोळा केलेल्या धान्यपैकी १०० किलो धान्य संविता आश्रम पणडुर, १०० किलो धान्य जिव्हाळा सेवाश्रम पिंगुळी,१५० किलो धान्य गावातील गरजू व गरीब व्यक्तींना प्रत्येकी १० किलो प्रमाणे देण्यात आले.

तसेच वजराट देवसुवाडी तर्फे अणाव येथील आनंदाश्रम यांना १०० किलो धान्य देण्यात आले.यावेळी श्री देव गिरेश्वर सोसायटीचे चेअरमन बाबुराव परब,उपाध्यक्ष वसंत पेडणेकर, संचालक विलास गावडे, सचिव पांडुरंग दळवी, ग्रामसेवक गावडे, रवींद्र पेडणेकर, साईप्रसाद केरकर, बाळकृष्ण सोनसुरकर,प्रवीण गावडे,रजत पडते आदी उपस्थित होते.यावेळी रवींद्र पेडणेकर आणि आनंद करंगुटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यापूर्वी गावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१,०१९ रुपयाची मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page