वेंगुर्ला-अजय गडेकर

शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त व आज सकाळी प्राप्त अहवालानुसार वेंगुर्ला तालुक्यात एकूण ६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे. यामध्ये म्हापण येथील २ व्यक्ती असून आधीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.तसेच आज शनिवारी सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये वेंगुर्ला शहरातील ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यातील ३ व्यक्ती आनंदवाडी येथील असून आधीच्या पॉझिटिव्ह संपर्कातील आहेत व १ व्यक्ती कुबलवाडा येथील असून आधीच्या पॉझिटिव्ह संपर्कातील आहे.दरम्यान शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करून विशेष दक्षता घ्यावी,असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page