‘बीएसएनएल’ च्या आणखी 20 हजार कर्मचाऱ्य़ाच्या नोकऱ्या जाणार

‘बीएसएनएल’ च्या आणखी 20 हजार कर्मचाऱ्य़ाच्या नोकऱ्या जाणार

मुंबई-६सप्टेंबर

कोरोनामुळे देशभरात खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्य़ांच्या नोकऱ्य़ा गेल्या असताना केंद्र सरकार आता आपल्या कर्मचाऱ्य़ाना बेकारीच्या खाईत लोटत आहे. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात ‘बीएसएनएल’ आणखी 20 हजार कर्मचाऱ्य़ाना कामावरून काढणार आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कंत्राटी कामगारांना एक वर्षापासून पगारच मिळालेला नाही. त्याच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे.बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने काही महिन्यांपूर्वी 30 हजार कंत्राटी कामगारांना कामावरून काढले होते. आता आणखी 20 हजार कामगारांना काढणार आहे.
1 सप्टेंबरला बीएसएनएलच्या एचआरने कंपनीच्या सर्व मुख्य व्यवस्थापणाने खर्चात कपात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही कामगार कपात केली जात आहे. कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी यांची गरज नाही असे त्यात म्हटले होते.13 कामगारांनी आत्महत्या केल्या.बीएसएनएल कर्मचारी संघटनेने बीएसएनएलचे चेअरमन पी.के.पुरवार यांना पत्र लिहिले आहे. 14 महिन्यांपासून कंत्राटी कामगारांचा पगार नाही. कामगारांची परिस्थिती खूप गंभीर बनली आहे. आतापर्यंत 13 कंत्राटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. याकडे पत्रात लक्ष वेधले आहे.व्हीआरएस योजनेमुळे प्रचंड फटक कर्मचाऱ्य़ांसाठी लागू करण्यात आलेल्या स्वेच्छा निवृत्ती वेतन अर्थात व्हीआरएस योजनेचा मोठा फटका कंपनीला बसला. आर्थिक परिस्तिथी खूपच बिघडली आहे अशी कबुली बीएसएनएलचे चेअरमन पी.के.पुरवार यांनी दिली.

अभिप्राय द्या..