विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता उपसभापती निवडीवरून वाद

विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता उपसभापती निवडीवरून वाद

मुंबई.६सप्टेंबर

विधान परिषद उपसभापती निवडणुकीवरून विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. सध्या परिषदेतील १८ जागा रिक्त आहेत. तसेच करोनामुळे अधिवेशनासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता या अधिवेशनात उपसभापतींची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी भाजपने सरकारकडे के ली आहे. मात्र याच अधिवेशनात दुसऱ्या दिवशी उपसभापतींची निवडणूक घेण्याची व्यूहरचना महाविकास आघाडीने आखल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.७८ सदस्यीय विधान परिषदेत सध्या २२ सदस्यांचा भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीकडे सेना १४, राष्ट्रवादी ९, काँग्रेस ८, लोकभारती एक असे संख्याबळ असून १८ जागा रिक्त आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरून राजभवन आणि सरकारमध्ये अद्यापही एकवाक्यता आलेली नाही. याच अधिवेशनात उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याची सरकारची योजना आहे. याची कु णकु ण लागताच कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करीत या अधिवेशनात उपसभापतींची निवडणूक घेऊ नका, अशी मागणी भाजपने के ली होती. एवढेच नव्हे तर तसे पत्रही विधान परिषद सभापतींना पाठविण्यात आले आहे.
करोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे उपसभापतींची निवडणूक लांबणीवर टाकल्यास काही फरक पडणार
नाही. या अधिवेशासाठी सर्व सदस्य उपस्थिती राहण्याची शक्यता कमी असून अशा परिस्थितीत निवडणूक घेतल्यास अनेक सदस्यांना मदतानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल, त्यामुळे ही निवडणूक घेऊ नये अशी विनंती करणारे पत्र सभापतींना पाठविण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.याच अधिवेशनात ही निवडणूक घेण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आयत्यावेळी ही निवडणूक घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीबाबतचे सर्व अधिकार सभापतींना असून तेकेव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकतात. सत्ताधाऱ्यांकडून माजी उपसभापती शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा एकदा या पदावर संधी देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अभिप्राय द्या..